Chemical Engineering Opportunities in COVID-19
वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनिझशन (WHO) ने जाहीर केल्यानुसार कोविड 19 हा श्वसनाचा रोग कोरोना व्हायरस मुळे जगभरात प्रसारित झाला आहे. आज जगभरात 4 करोड पेक्षाही जास्त लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत तर 10 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अजूनही हा व्हायरस किती हानी पोहोचवणार आहे हे सांगणे अशक्यप्राय आहे.
या विषयी जाणून घेऊ या अधिक डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, कोल्हापूर येथील डॉ. के. टी. जाधव यांचेकडून...
बऱ्याच विकसित देशांमध्ये या कोरोना व्हायरस वरील लस शोधण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनाइटेड किंग्डम, रशिया तसेच भारतातील *भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटयूट* या संस्थांनी कोरोनावरील लस शोधून काढली आहे या संशोधनात केमिकल इंजिनिअर्सचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. अनेक केमिकल इंजिनिअर्स या सायंटिफिक कम्युनिटी चा भाग बनले आहेत.
इंजिनिअर्स या संशोधनात भाग घेऊन या रोगावरची लस किंवा औषध शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. फार्मासिस्ट, डॉक्टर्स, संशोधक, शास्त्रज्ञ, बॉयलॉजिस्ट हे एकत्रित पणे काम करीत आहेत. अनेक प्रकारचे मेडिसिन, त्यांचे उत्पादन, N 95 मास्क, फेस शिल्ड, डोअर ओपनर्स, सॅनिटायझर्स, हेल्थ केअर प्रॉडक्ट्स, अँटी व्हायरल डोसेस, व्हेंटीलेटर्स इ. यामध्ये केमिकल इंजिनीअर्स महत्वाचे काम बजावत आहेत.
कोणतीही लस किंवा औषध तयार झाले कि त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे हे एक मोठे आव्हान असते. यामध्ये केमिकल इंजिनीअर्स, फार्मासिस्ट, एन्विरॉन्मेंटल इंजिनीअर्स हे एकत्रितपणे काम करत असतात. तसेच वेगवेगळे मेडिसिन तयार करणे, मास्क, शीएल्ड, व्हेंटीलेटर्स भाग, ऑक्सि जनरेटर्स, अरोसोल्स, बॉयलॉजिकल कॉंटॅमिनंट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, एक्सहास्ट गॅस ट्रीटमेंट, या कार्यात केमिकल इंजिनीअर्स चा मोठा सहभाग असतो.
केमिकल इंजिनीअरिंग च्या संधी.
केमिकल इंजिनीरिंग मध्ये केमिस्ट्री बरोबरच अनेक उपशाखांचा अभ्यास केला जातो, यामध्ये एनर्जी कॉन्सर्व्हशन (ऊर्जा बचत), एन्विरॉन्मेंटल कंट्रोल (पर्यावरण नियंत्रण), बायोटेक्नॉलॉजी (जैविक तंत्रज्ञान ), प्लास्टिक, पॉलिमर, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, फार्मास्युटिकल इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो.
केमिकल इंजिनीरिंग ही दैनंदिन जीवनातील प्रत्येक गरजेशी निगडित असलेली शाखा असून त्यामुळे खते, अल्कोहोल,औषधे,एल पी जी गॅस, पेट्रोल, डिझेल, साबण, तेल, जेली, तणनाशके, कीटकनाशके, पेन्ट्स, ग्रीस,प्लास्टिक, कागद, रबर, फायबर इ. उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये केमिकल इंजिननेअर्स ना भरपूर मागणी आहे.
या सर्व गोष्टी जीवनातील प्रत्येक अंगाशी संबंधित असलेने भविष्यकाळातील भरपूर मागणी असणारी एव्हरग्रीन ब्रँच म्हणून संबोधले जाते.
सध्या भारतात बरीच चर्चिल्या जाणाऱ्या शाखेमध्ये बायो टेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल या शाखाही केमिकल इंजिनीअरिंग च्या संबंधीत असल्याने केमिकल इंजिनीअर्स या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करू शकतात.
कोणत्याही शाखेची निवड ही त्यासंबंधित मिळणाऱ्या भविष्यकालीन संधींवर अवलंबून असते आणि या शाखेसाठी उपलब्ध असलेल्या संधी खाली दिलेल्या इंडस्ट्री मध्ये बऱ्याच प्रमाणात आहेत.
उदा. रिलायन्स, आईओसीएल, हिंदुस्थान युनीलिव्हर, एल अँड टी, एचपीसीएल, ओएनजीसी, आरसीएफ, ब्रिटानिया, कृभको, घरडा, रॅनबॅक्सि, फिनोलेक्स, प्राज इंडस्ट्रीज, विनती ऑर्गॅनिकस, व्हीव्हीएफ, प्रिव्ही ऑर्गॅनिकस, टेक्नोफोर्स, इ.
केमिकल इंजिनीअर्स ना बऱ्याचदा युनिव्हर्सल इंजिनिअर्स म्हणून संबोधले जाते कारण केमिकल इंजिनीअर्स हा पेट्रोलियम इंजिनीअर, पेट्रोकेमिकल इंजिनीअर, पॉलिमर इंजिनीअर तसेच प्लास्टिक आणि बायोकेमिकल इंजिनीअर म्हणून कामे करू शकतो. डिझाईन इंजिनीरिंग आणि संशोधन क्षेत्रातही या शाखेला भरपूर वाव आहे. म्हणूनच या शाखेला कॅनडा, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, ओमान, इराण, इराक, सौदी अरेबिया, गल्फ देशात मोठी मागणी असून आपल्या देशातील बरेच केमिकल इंजिनिर्स सध्या बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर या देशांमध्ये कार्यरत आहेत.
सध्याच्या काळात इंधन तुटवडा ही संपूर्ण जगाची एक मोठी समस्या बनलेली आहे त्यामुळे संपूर्ण जगभर त्याचबरोबर आपल्या देशात पारंपरिक इंधनाला पर्याय शोधण्यासाठी मोठे संशोधन चालू आहे. यासाठी सरकारची आर्थिक मदत देखील मिळते.
याचमुळे ठिकठिकाणी बायोडिझेल, इथेनॉल, सीएनजी, एलएनजी, हैड्रोजन इत्यादींचे नववीन प्रोजेक्ट्स सुरु झाले आहेत. या सर्व इंधनाच्या उत्पादन प्रक्रियेत देखील केमिकल इंजिनीअर्स चा सिंहाचा वाटा आहे.

Post A Comment
No comments :