technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

महाराष्ट्रीतील खासगी विद्यापीठांच्या हक्कासाठी लढण्यासाठी 'PERA' संस्था

गुणवत्तापूर्ण क्षमताधारक विद्यार्थ्यी घडविण्याचे 'पेरा'च्या माध्यमातून कार्य 



राज्यातील स्वयंम अर्थसाहित खासगी विद्यापीठांनी एकत्र येत सेक्शन ८ कंपनीस् ॲक्ट २०१३  कायद्यानुसार PERA (Preeminent Education & Research Association) या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. मंगेश कराड, तर पेरा इंडियाचे उपाध्यक्ष भारत अग्रवाल काम करत आहे.

महाराष्ट्रीतील खासगी विद्यापीठांच्या हक्कासाठी लढण्यासाठी 'PERA' संस्था


या संस्थेच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील स्वयंम अर्थसाहित खासगी विद्यापीठांच्या समस्या आणि इतर महत्वाचे प्रश्न, आरक्षण, अधिकृतता, वेतन आयोग, मार्गदर्शक तत्त्वे आणि एफएसआय बनविण्यासाठी शहर नियोजनाच्या मान्यता संदर्भातील प्रश्न महाराष्ट्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय आणि विविध सरकारी परिषदांकडे मांडणे आणि समस्या सोडविण्याचे काम केले जात आहे.

राज्यातील खासगी विद्यापीठांच्या हक्क व न्यायांसाठी ही संस्था नेहमीच अग्रही भूमिका निभवत असल्याची भावना  पेरा या संस्थेच्या सदस्यांनी आज झालेल्या वेबीनारमध्ये मांडली. तसेच राज्यातील खासगी विद्यापीठांतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांना गती देण्यासाठी 'पेरा' सदैव तत्परतेने काम करत राहिल अशी भावना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली.

पेरा इंडिया या संस्थेमध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे, डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी, पुणे, डीवाय पाटील  विद्यापीठ, पुणे अँबी इत्यादी सदस्यांची समावेश होतो.


'PERA INDIA'चे कार्य


संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 19 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली असून ती आज राज्यभर कार्यरत आहेत.



  • उच्च शिक्षणाची संपूर्ण उन्नती आणि प्रगती करण्यासाठी उच्च शिक्षण, संशोधन आणि इतर अतिरिक्त-अभ्यासक्रम व सह-अभ्यासक्रांना प्रोत्साहित करणे आणि सुलभ करणे, ज्ञानाच्या प्रगती आणि प्रसारासाठी संशोधन आणि नवीन शोध प्रेरणा आणि अंतर्भूत करणे.
  • देशातील आणि राज्यातील स्वयंम अर्थसाहित खासगी विद्यापीठांच्या समस्या आणि इतर महत्वाचे प्रश्न, आरक्षण, अधिकृतता, वेतन आयोग, मार्गदर्शक तत्त्वे आणि एफएसआय बनविण्यासाठी शहर नियोजनाच्या मान्यता संदर्भातील प्रश्न महाराष्ट्र सरकार विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय आणि विविध सरकारी परिषदांकडे मांडणे आणि समस्या सोडविणे,
  • समाजातील उच्च शिक्षणाच्या विकासास हातभार लावण्यासाठी विवादास्पद अभ्यास, विस्तार कार्यक्रम आणि अभ्यासक्रमाबाहेरचे उपक्रम राबविण्यासाठी फॅकल्टी विकास कार्यक्रम, सेमिनार, परिषदा आयोजित करणे,
  • उद्योग क्षेत्रातील कंपन्यासोबत सामंजस्य करार करणे, शैक्षणिक उत्कर्ष यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात दुवा म्हणून काम करणे,
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नॅक, एनबीए, एनआयआरएफ, यूजीसी, एमएचआरडी, आयएसओ, आयएलओ, क्यूएस जागतिक क्रमवारी व रेटिंग इत्यादी माध्यमातून मान्यता प्राप्त करण्यासाठी सहकार्य करणे, या संस्थाच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी परी घेणे आणि निकाल जाहीर करणे,
  • गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार, शिष्यवृत्ती, फ्रिशीप, फेलोशीप आणि बक्षिसे व पदके देणे,
  • पेरा अंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी विद्यापीठांचे विविध प्रश्नांची बाजू सर्वाच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि इतर कायदेशीर संस्थासममोर मांडणे, खाजगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी सीईटी परीक्षा घेणे हे या संस्थेचे मुख्य उद्देश आहेत.

मंगेश कराड  पुढे म्हणाले की,  आम्ही राज्यातील पालकांचे व पाल्यांचे स्वप्न पूर्ततेसाठी मेहनत घेतो. हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी प्रयत्नशील असतो. जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी तत्पर असतो. खासगी विद्यापीठ हे बदलत्या काळानुरुप देशसेवा करत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहोत.

खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक प्रायोगिक अभ्यासक्रम चालवले जाते. चीनमध्ये 1500 खासगी व 500 सरकारी विद्यापीठ आहेत. तर भारतात केवळ हजार विद्यापीठ आहेत. आमच्या तीन हजारांहून अधिक खासगी विद्यापीठांची आवश्यकता आहे. रॅँकिंग सिस्टिमच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.

खासगी विद्यापीठ ही काळाची गरज आहे. पालकांची काळजी ही आमची प्रथम गरज आहे. जागतिक स्तरावरील गरजा आआओळखून विद्याथीर्थी घडविण्याचे काम खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून होईल. शिक्षण 4.0 च्या गरजानुसार सर्व खासगी विद्यापीठांनी व्हर्चुअल लॅब, क्लाऊड लॅब, व्हिडिओ लॅब आणि ई- लयाब्ररीची सुरूवात केली आहे.

भरत अग्रवाल म्हणाले, विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचे काम आम्ही करत आहोत. खासगी विद्यापीठांना राज्य सरकारच्या मान्यतेनुसार आपल्या अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी काम करता येते. राज्य विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्ये काही खास फरक नाही.

सगळ्यांचांच मुल्यात्मक आणि गुणात्मक शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. खासगी विद्यापीठांमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यांचा विचार आणि काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची रचना केली जाते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ताधारक प्राध्यापकांचा समावेश येथे केला जातो. इननोव्हेशन, डेटा सायन्स, संगीत, फाईन आर्ट यासारखी अभ्यासक्रमही खासगी विद्यापीठामध्ये चालवले जातात. आयसीएसई, सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना पेरा सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल.

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले पब्लिक आणि खासगी क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धांसोबत विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम या खासगी विद्यापीठांकडून केले जात आहे. खासगी विद्यापीठांना त्याचा अभ्यासक्रमाची रचना आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याची मुभा राज्य सरकारच्या कायद्यानुसार दिली आहे.

एमजीएम विद्यापीठ औरंगाबदच्या माध्यमातून टिंचिंग बेस मेथडालाॉजीचा विकास करून प्रोजेक्ट बेस लनिर्निंग मेथडालाॉजीचा विकास करत विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण देत आहोत. आत्याधुनिक शिक्षा पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरची हमी खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून दिली जात आहे.

अत्याधुनिक पायाभूत सुविधा, गुवणत्ताधारक प्राध्यपकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आम्ही करतो.  पेरा संस्था डिजिटल इंस्ट्रक्चर कंटेट व टिचर एक्सेच आणि पेरा संस्थेच्या अतंर्गत येणाऱ्या विद्यापीठांची एकत्र परीक्षा पद्धती घेण्याचा आमचा विचार आहे.

संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू व्यंकटेश रायकर म्हणाले, बदलत्या काळानुरूप आणि जागतिक दर्जाचे प्रायोगित तत्वावरील अभ्यासक्रमांची रचना करत स्कील युक्त गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची घडवणूक करण्याचे काम खासगी विद्यापीठाच्या माध्यमातून केले जात आहे. संशोधनात्मक आणि ज्ञानात्मक विद्यार्थी घडविण्याचे ध्येय आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांना आकर्षण करणारे अभ्यासक्रमांची रचना आणि जागतिक विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करत विद्यार्थी आणि शिक्षक देवाण-घेवाण कार्यक्रम घोडावत विद्यापीठ राबविते. आमचा कॅँपस हा ग्रीन कॅँपस म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही एकटे असल्यास 

स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू संजीवन अरसूट म्हणाले, आम्ही देश सेवा करत असततो. युजीसीच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रमांची रचना आमच्या विद्यापीठाने  केली आहे. आम्ही चाॉईस बेस अभ्यासक्रमांची रचना केली आहे. फार्मसीसह लॅा आणि अन्य विषयांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करत आहोत. क्रेडिट सिस्टिमच्या माध्यमातून शिक्षण हे आमचे वेगळेपण आहे.

डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रभात रंजन म्हणाले, डीवाय पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनात्मक विद्यार्थी घडविण्याचे काम केले जात आहे. खासगी विद्यापीठ भविष्यातील दशकात महत्वाचा रोल आदा करेल. चेंजमेकर निर्मितीची गरज आहे. तंत्रज्ञान जलदगतीने बदलत आहे. या बदलत्या काळानुरूप आम्हाला बदल्यांची गरज आहे.

तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. पेरा यांनी केवळ सीईटी सारखी परीक्षा घेऊन नये, तर भविष्यात संशोधनात्मक विद्यार्थी घडविण्याचे नेतृत्व करावे. भविष्यात नोकरी करणारी पिढी तयार करू नाही, तर नोकरी देणारी पिढी घडविण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून व्हावे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कुलगुरू मणिमाला पूरी म्हणाल्या, कोरोना नंतरच्या काळात खासगी विद्यापीठांचा महत्वाचा रोल असणार आहे. कोरोना महामारीपूर्वी आणि नंतर खाण्याच्या पद्धतीत बदल झाले आहे. तसेच खरीदीच्या सवयीतही बदल झाले असून ऑनलाईन खरीदीला अधिक महत्व आले आहे. भविष्यात सगळ्याच क्षेत्रात बदल होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या स्कील नुसार शिक्षण देण्याची गरज आहे. विद्याथीर्थी ही इंडस्ट्रीच्या गरजानुसार अभ्यासक्रमाची रचना करावी लागणार आहे. आत्याधुनिक पायाभूत सुविधासह तंत्रज्ञानाधिरीत शिक्षकांची गरज असणार आहे. आऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज असणार आहे त्यामुळे सर्व विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार बदलावे.

एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एन. टी राव म्हणाले, खासगी विद्यापीठांना या महामारीनंतर संधी निर्माण करण्याची संधी आहे. खासगी विद्यापीठांकडे निर्णय घेण्याची ताकद असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानुसार बदलता येते. इंडस्ट्रीच्या गरजानुसार अभ्यासक्रमाची रचना करता येते. त्यामुळे भविष्यात खासगी विद्यापीठांना महत्व येणार आहे. मुल्यात्मक शिक्षण देत तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची गरज असणार आहे. शिक्षणापलिकडे तंत्रज्ञानाधिरत वैयक्तिक शिक्षण खासगी विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणार आहे. वैयक्तिक लक्ष देत विद्यार्थ्यांचा विकास हा आमचा उद्देश आहे.

डीवाय पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू सायली गणकर म्हणाल्या, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी युवकांना त्या क्षमतेचे बनविण्याचे कार्य विद्यापीठांचे आहे. सायबर सुरक्षा आणि ललोकेशन डिटेकश सिस्टिम बनविणाऱ्या विद्यार्थी घडविण्याचे काम आमचे विद्यापीठ करत आहे. स्कीलयुक्त विद्याथीर्थी घडविण्यासह फॅक्लटी विकास कायर्यक्रम ही घेणे ही काळाची गरज असणार आहे. ते डीवाय पाटील विद्यापीठात केले जाते. संशोधनाची संधी निर्माण करून संशोधक विद्यार्थी घडविण्याचे आमचा उद्देश आहे.

संदीप विद्यापीठाच्या इंजीनिअरिंग विभागाचे प्रिन्सिपल एस. टी. गंधे म्हणाले, संदीप विद्यापीठ ही नाशिक विभागासाठी महत्वपूर्ण आहे. आमच्या जागतिक स्तरावरील आत्याधुनिक सुविधा आहेत. आमच्याकडी शिक्षकांची निवड आम्ही आयआयटी मधून करतो. विद्यार्थी केंद्रीत शिक्षाला महत्व देतो. इंडस्ट्रीला आवश्यक मनुष्यबळाची गरज आम्ही पूर्ण करतो. अनेक सरकारी संस्थासोबत करार करून अनेक गावांचा विकास केला जातो.     


खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी पेरा सीईटी


पुढे, प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो.

यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल याची शाश्वती नाही. जेईई सीईटी परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पेरा या खासगी विद्यापीठाच्या संघटनांनी 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन परीक्षा पद्धतीद्वारा सीईटी  घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सीईटीच्या आधारे विद्यार्थी राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून शकतात. पेरा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी  28 जुलै ही अंतिम तारीख आहे. विद्यार्थ्यांना या सीईटीची ऑनलाइन परीक्षा पद्धत समजून घेण्यासाठी 26 व 27 जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घरातूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


Tags: pera CET 2020

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]