technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

नवजात शिशू आणि पालकत्व पोषण

Newborn babies and parenting nutrition


सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. पौष्टिक आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, वेळेपूर्वी प्रसूती झालेल्या बाळांच्या पोषणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

खराडी, पुणे येथील मदरहूड हॉस्पिटलचे सल्लागार, नेओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख (Tushar Parikh, Consultant, neonatologist and Pediatrician, Motherhood Hospital, Kharadi, Pune) यांचेकडून जाणून घेऊ या अकाली जन्मलेल्या म्हणजेच वेळेआधीच जन्म झालेल्या नवजात शिशूंचा शारीरिक विकास आणि वाढ योग्य पद्धतीने करण्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यायला हवीय. 


अकाली जन्मलेल्या म्हणजेच वेळेआधीच जन्म झालेल्या नवजात शिशूचा शारीरिक विकास आणि वाढ योग्य पद्धतीने व्हावी. या बाळांना कोणत्याही प्रकारच्या गंभीर आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या पोषण आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. पौष्टिक आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, वेळेपूर्वी प्रसूती झालेल्या बाळांच्या पोषणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, अकाली जन्म झालेल्या बाळाचे आतडे कमकुवत असतात. अशावेळी आईचं दुध ते पचवू शकत नाहीत. याशिवाय वजन कमी असल्याने त्याला एनआयसीयूमध्ये दाखल केले जाते. अशा स्थितीत बाळाच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक घटक मिळावेत, याकरता त्यांना टोटल पॅरेस्ट्रारल पोषण (टीपीएन) दिले जाते. टीपीएन बाळांच्या शारीरिक विकासात आणि गंभीर आजारावर मात करण्यास मदत करते.

अकाली जन्मलेल्या नवजात बाळाची काय आणि कशी काळजी घ्यावी, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे.

1. ‘टीपीएन’ म्हणजे काय?


जेव्हा तोंडाद्वारे नियमित आहार घेऊ शकत नाही, अशा स्थितीत नवजात बाळांना टोटल पॅरेस्ट्रारल पोषण (टीपीएन) दिले जाते. यात सर्व दैनंदिन पोषक द्रव्ये आपल्या शरीरात मोठ्या शिरांद्वारे पुरविली जातात. जसे की, प्रथिने, कार्बोहायड्रेटस, मल्टीव्हिटॅमिन आणि खनिजे. अशाप्रकारे, पोषक थेट रक्तप्रवाहात पंप केले जातात. या पद्धतीत, पोषक तत्वांचा पुरवठा थेट ट्यूबद्वारे पोट किंवा लहान आतड्यात होतो. जेव्हा नवजात मुलं तोंडाने दुध पिऊ शकत नाही, तेव्हा ही पद्धत वापरली जाते.

2. ‘टीपीएन’ चा पर्य़ाय का निवडला जातो?


अत्यंत अकाली जन्मलेल्या बाळांना खूप अपरिपक्व गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट असते जे अन्न पचविण्यात अक्षम आहे. या अत्यंत अकाली बाळांमध्ये पोषणद्रव्ये फारच मर्यादित असतात. जन्मापूर्वी बाळ प्रत्यक्षात नाळातून आईकडून ‘टोटल पॅरेंटलल न्यूट्रिशन’ घेत असतो. एकदा बाळाची प्रसूती झाली की बाळ नाभीसंबधीचा पोषक पुरवठा कापला जातो. अशावेळी बाळांची पोषक तत्वांची वाढती मागणी लक्षात घेता बाळांना अंतःस्रावी मार्गाद्वारे सर्व आवश्यक पोषक आहार दिले जाते. हे पोषक संतुलित प्रमाणात मिसळलेल्या शुद्ध वैद्यकीय स्वरूपात दिले जातात. ज्याद्वारे बाळांचे शारीरिक पोषक द्रव्यांना पचवते आणि वाढीस मदत करते.

3. आजारी नवजात बाळांना ‘टीपीएन’ कसा दिला जातो


तुम्हाला माहिती आहे का? बाळाच्या हात, पाय किंवा टाळूच्या शिरामध्ये आयव्ही लाइन ठेवली जाते. त्याचप्रमाणे, पोटातील बटन (नाभीसंबंधी शिरा) मध्ये असलेली एक मोठी शिरा सुद्धा वापरली जाते. या आयव्हीद्वारे नवजात शिशूंना आहारातील पोषक द्रव्य शरीराला पुरवली जातात. जेणेकरून बाळाची शारीरिक वाढ योग्य पद्धतीनं होण्यात मदत मिळेल, हा यामागील मुख्य उद्देश असतो. 
Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]