technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम

अपोलो डायग्नोस्टिक्सव्दारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष 


पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम




निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहारात पौष्टिक घटक आणि आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश करणं गरजेचं आहे. यासाठी नियमित आरोग्याची तपासणी करणंही आवश्यक आहे.

राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२० या निमित्ताने पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिक्स या संस्थेच्या अपोलो हेल्थ अँण्ड लाइफस्टाईल लिमिटेड (एएचएलएल) या निदान विभागाने पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याबाबत सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासाव्दारे बहुतांश तरूणांमध्ये मानसिक आजाराची समस्या समोर आली आहे. पौष्टिक आहाराचा अभाव हा यामागील मुख्य कारणं आहे.


सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा सप्ताह साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात. त्यामुळे चांगल्या स्वास्थ्याचे गुपित हे चांगल्या आहारात आहे. या उद्देशाने १९८२ पासून सप्टेंबरचा पहिला आठवडा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘न्यूट्रिशन बोर्ड’तर्फे ‘न्यूट्रिशन वीक’ म्हणून साजरा केला जातो.

या सप्ताहाच्या निमित्ताने अपोलो डायग्नोस्टिक्सव्दारे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना मानसिक आजारांची समस्या भेडसावत असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या मानसिक आरोग्यामध्ये पौष्टिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.  कारण यामुळे आपल्या मनाची मनोवृत्ती,  चिंतेची पातळी,  लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेच्या प्रत्येक इतर बाबीवर त्याचा परिणाम होतो. चांगले खाणे (म्हणजे भाज्या आणि पोषक तत्वांचा समतोल आहार) भावनांशी संबंधित असू शकतो. संतुलित आहार मिळविण्यासाठी शरीरात पौष्टिकतेची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी,  कॅल्शियम, आणि लोह यासारख्या गोष्टी आहारात समावेश करणं गरजेचं आहे.  

अपोलो डायग्नोस्टिक्स (पश्चिम विभागीय) झोनल पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले की, आजकालच्या जीवनशैलीत आहाराचे ज्ञान असणे फारच आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात आपण बाहेरचे जेवण, विकतच्या फराळाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न, रेडिमेड मसाला यावर अवलंबून असतो. यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळत नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे

आपल्या शरीरात योग्य पोषण आहाराचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचं आहे. या उद्देशाने अपोलो डायग्नोस्टिक्सने पौष्टिक पोषण सप्ताहाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

या आरोग्य तपासणीत २५-५५ वयोगटातील सर्व व्यक्तींचे नमूने घेण्यात आले होते. या नमून्यांच्या अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले की, गेल्या १२ महिन्यांत आरोग्य तपासणी केलेल्या जवळजवळ २०% लोकांना पोषण कमतरता आहे. यामागील  मानसिक आरोग्य हे मुख्य कारण आहे.”

डॉ. इंगळे पुढे म्हणाले की, ‘‘पौष्टिक घटकांबाबत माहिती नसल्याने लोक प्रथिने, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, झिंक, लोह या पोषण आहाराकडे दुर्लक्ष करतात. अशा पोषणांची नियमित आरोग्य चाचणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून निरोगी आरोग्य जगता येईल.”

झिंक - खराब झिंक पातळी मूड आणि चिंतेच्या पातळीवर परिणाम करू शकते.  भूक कमी करू शकते आणि व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो.

ओमेगा-३ फॅटी अँसिड - हे मेंदूच्या निरोगी कार्यास समर्थन देते आणि कमी पातळीमुळे अस्थिर मनःस्थिती, नैराश्य, चिंता, एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन डी – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

बी 12 – या जीवनसत्त्वाच्या सेवनामुळे नैराश्यावर मात करता येऊ शकते.

मॅग्नेशियम - मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास चिंता आणि भीती, अस्वस्थता, झोप न लागणे आणि चिडचिडेपणा ही समस्या जाणवते.

सेलेनियम - यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]