technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

Career Opportunities in Pharmacy (Marathi)

After completing the pharmacy course, the student has access to traditional as well as various modern employment opportunities. We will learn more about these opportunities briefly from expert Chandrasekhar Bobade (Assistant Professor at the School of Pharmacy, Pune).

फार्मसी: उज्ज्वल करिअरचा ग्रीन झोन

फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विध्यार्थ्याला पारंपरिक तसेच विविध आधुनिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा आपण थोडक्यात परिचय घेऊ या चंद्रशेखर बोबडे (Assistant Professor at School of Pharmacy, Pune) यांचेकडून. 







कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जगअभूतपूर्व संकटात सापडलं आहे.एका नवख्या व अकस्मित येणाऱ्या रोगावर योग्य व परिणामकारक औषध कमी वेळेत शोधणे हे येणाऱ्या काळातील संशोधनला आव्हान देणार असेल व त्यासह खूप साऱ्या संधीही निर्माण होतील. कोरोनाच्या संकटात आज आपला देश जगातील इतर विकसित देशांना महत्वाची औषध निर्यात करत आहे, खरंच ही  देशाच्या औषध उद्द्योगासाठी अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या काळात औषध संशोधन व निर्मिती जगभरातच वाढेल व विकसित होईल, हे निश्चित.

औषधाचं ज्ञान देणारा अभ्यासक्रम म्हणजे औषधनिर्माणशास्त्र ज्याला आपण "Pharmacy" असे म्हणतो. बारावी विज्ञान उत्तीर्ण  झालेल्या ज्या विध्यार्थ्यांना जीवन विज्ञानावर आधारित विषयात विशेष आवड व  यात करियर करण्याची इच्छा आहे अशा विध्यार्थ्यांसाठी फार्मसी  हा उत्तम पर्याय आहे.

आपल्या देशात फार्मसी  पदविका (D. Pharmacy - कालावधी २ वर्ष), पदवी (B. Pharmacy कालावधी ४ वर्ष), पदवीयुत्तर (M. Pharmacy, कालावधी २ वर्ष) व तसेच फार्म डी हा बारावीनंतर ६ वर्ष (५ वर्ष अभ्यासक्रम व १ वर्ष रुग्णालयात प्रक्षिशण) हा नविन, रुग्णाभिमुख अभ्यासक्रम हे पर्याय उपलब्ध आहेत.

या सर्व अभ्यासक्रमास २०२० - २१ ह्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेण्याची पात्रता व इतर विस्तृत माहिती लवकरच नियामक मंडळाद्वारे जाहीर केली जाईल.

औषधनिर्माणशास्त्र हा बहुविषयी अभ्यासक्रम आहे. Pharmacy Council of India ही राष्ट्रीय संस्था फार्मसी अभ्यासक्रम नियंत्रित करते. मागील दोन वर्षांपासून पूर्ण देशभर फार्मसी शिक्षणात एकरूपता यावी या उद्देशाने पदवी व पदवीयुत्तर वर्गासाठी  संपूर्ण देशभर समान अभ्यासक्रम लागू केला आहे, फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विध्यार्थ्याला पारंपरिक तसेच विविध आधुनिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा आपण थोडक्यात परिचय घेऊ या.


संशोधन व  विकास

या विभागात मुख्यतः नवीन औषधी मॉलिक्युल ओळखून त्यावर पुढे मानवीय  उपयोगासाठी चार टप्प्यात (फेजेस) संशोधन केलं जात व तसेच जुन्या उपलब्ध औषधांची निर्मितीची प्रक्रिया, स्वरूप बदलत जास्त परिणामकारक व गुणकारी करण्यासाठी बदल केले जातात.  या  विभागात संशोधन सहायक म्हणून सुरुवातीला काम करता येत व त्यासाठी पदवीयुत्तर म्हणजे एम फार्मसी व तसेच पूर्ण वेळ पी एच डी पदवी असलेल्या विध्यार्थ्यांना प्राधान्य दिल जात. तसेच भारत सरकारच्या विविध प्रयोगशाळा, राष्ट्रीय संशोधन केंद्र, विद्यापिठं इत्यादी ठिकाणी संशोधक म्हणून नौकरी मिळू शकते.

औषधनिर्मिती व  गुणवत्ता परीक्षण : या विभागात औषधाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व परीक्षण केलं जात. या दोन्ही विभागात पदवी आणि पदवीयुत्तर फार्मसी विध्यार्थ्यांना  खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या विभगात निर्मिती निरीक्षक, निर्मिती अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण परीक्षण अधिकारी, पॅकिंग विभाग अधिकारी इ महत्वाच्या हुद्द्यावर काम करता येत. तसेच मूळ (Bulk Drugs) औषध निर्मिती व परीक्षण यातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत व येणाऱ्या काळात भारत सरकारच्या औषध विकास धोरणामुळे यात अजून जास्त नौकऱ्या निर्माण होतील.

Drug Regulatory Affairs या विभागात नवीन औषध बाजारात आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व तपशीलवार माहिती संकलित करणे, लिहणे, पडताळणी झाल्यावर अन व औषध विभागास वारंवार माहिती कळवत विक्रीचा परवाना मिळविण्या पर्येंतचे काम या विभागात पहिले जाते.

बौद्धिक संपदा विभागही याच्याशी संबधीत विभाग असून यामध्ये औषध संशोधन झाल्यावर सदरील औषधाच पेटंट मिळवण्याची सर्व प्रक्रिया केली जाते. या दोनही विभागात भरपूर संधी उपलब्ध आहेत.

आय टी  फार्मसी हे रोजगाराचं नवीन दालन आहे व यामध्ये गेली ५ वर्ष झालं हजारो फार्मसी पदवी व पदवीयुत्तर विध्यर्थ्याना रोजगार मिळाले आहेत.

यात मुख्यतः फार्माकोव्हिजिलन्स (Pharmacovigilance), डेटा सायन्स (Data Science), मेडिकल कोडींग (Medical Coding), मेडिकल रायटींग (Medical Writing), बायोइन्फरोमॅटिकस (Bioinformatics), क्लिनिकल ऑपरेशन्स अँड डेटा मॅनेजमेंट (Clinical Operations and Data Management), वैद्यकीय पत्रकारिता (Medical Journalism), हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन (Health Administration), पेटंट अटॉरनी (Patent Attorney) इत्यादी क्षेत्रात नवीन व आवाहनात्मक संधी मिळत आहेत.

आज फार्मासिस्ट अहोरात्र औषध विक्री व समुपदेशन करत रुग्णसेवा करत आहेत.

फार्मसी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचा औषधविक्रीचा रिटेल, होलसेल व्यवसाय  करता येतो तसेच स्वतःचे औषध, सौंदर्य प्रसाधन,आयुर्वेदिक कंपन्या व संशोधन केंद्र सुरु करता येते. फार्मसी शिक्षण पूर्ण केल्यावर रेल्वे, संरक्षण, अन्न व औषध प्रशंसान, शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक आरोग्य विभाग इ विविध विभागात सरकारी  नौकऱ्या उपलब्ध आहेत.

ज्या विध्यार्थ्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची आवड व ईच्छा आहे त्याना फार्मसी महाविद्यालयात एम फार्मसी झालेल्या विध्यार्थ्यांना सहायक प्राध्यापक म्हणून काम करता येत.

पदवी पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षादेत ड्रग इन्स्पेक्टर (Drug Inspector), फूड इन्स्पेक्टर (Food Inspector), गव्हर्मेंट अनॅलिस्ट (Government Analyst), अन्न व औषध प्रशासन (Food and Drugs Administration) विभागात इतर अनेक महत्वाच्या पदावर सरकारी नौकरी मिळू शकतात.

तसेच औषध विक्री व मार्केटिंग, आरोग्यविमा संरक्षण, मार्केट सर्वे व बिझनेस अनॅलिस्ट यासारखाय खाजगी क्षेत्रातही खूप सार्या नवीन संधी आहेत.  फार्मसी पदवी व पदवीयुत्तर शिक्षण झाल्यावर परदेशात व तसेचआपल्या देशातही उच्च शिक्षणाचे विविध नवनवीन पर्याय आहेत.

कोरोना नंतर संपूर्ण जगात व आपल्या देशात आरोग्याशी संबंधित असलेल्या सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष देत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने खूप लक्षणीय बदल होतील याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

यात मुख्य म्हणजे औषध संशोधन  निर्मिती, व औषधांचा पुनर्वापर यावर विशेष लक्ष व  सकारत्मक विस्तार व विकास होण्याचे संकेतआता दिसत आहेत म्हणून येणाऱ्या काळात फार्मसी या आरोग्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रात ज्ञान व कौशल्य असणाऱ्या फार्मसी विध्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी जगभर निर्माण होतील यात शंका नाही.


For more information contact:


Chandrashekhar D. Bobde

(Assistant Professor at School of Pharmacy, Pune)

9921596447

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]