technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

What's wrong with Ajit Pawar?

...पण अजितदादा, तुम्ही चुकलात!




गेले दोन दिवस सुरु असलेला सस्पेन्स अखेर अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर संपला. अलीकडे राजकीय क्षेत्रांमध्ये धक्कादायक बातम्या येण्याचा जो ट्रेंड आला आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर परत महाराष्ट्राला काही 'ब्रेकिंग न्यूज' ऐकायला मिळेल की काय, या अटकळीवर बसलेल्या राजकीय विश्लेषकांना अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर फार काही हाती लागले नसण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज तर मिळाली नाही, मात्र महाराष्ट्रापुढे काही प्रश्न नक्कीच उभे राहिले असणार.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उभ्या महाराष्ट्राला चक्रावून सोडणार निर्णय अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांच्या समोर न येता अचानक मोबाइल नॉट रिचेबल करून ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्र बुचकळ्यात पडणे अगदी स्वाभाविक आहे. कहर म्हणजे खुद्द शरद पवार यांना जेव्हा या घटनेमागचे कारण माहित नाही हे कळल्यानंतर प्रकरणाचे गूढ आणि गांभीर्य निश्चितच वाढले.

एरवी आपल्या धडाकेबाज आणि रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा जरी असला तरी खुद्द शरद पवारांशी संपर्क तोडणे ही बाब त्यांच्या लौकिकाला साजेशी नक्कीच नाही!

राजकारणात वावरणाऱ्या व्यक्तीला आरोप-प्रत्यारोप काही नवीन नसतात. अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे असे गृहीत धरले तरी अजितदादा ज्याप्रमाणे गेल्या २४ तासांमध्ये वावरले हे निश्चितच चुकीचे होते.

राजकीय आरोपांच्या फैरी झाडण्यात कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा मागे नव्हती. त्यामुळे सरकार कुणाचेही असो, राजकीय चिखलफेक हा लोकशाहीचा अपरिहार्य भाग आहे. किमान आपल्या देशात तरी भ्रष्टाचाराचे आरोप होणे काही जघन्य अपराध आहे अशातील भाग नाही.

राष्ट्रवादीचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले म्हणजे काही भ्रष्टाचार संपला वगैरे वल्गना करणे मूर्खपणा आहे, त्यामुळे अजित पवारांवर झालेले आरोप खरे की खोटे हा आजच्या चर्चेचा मुद्दा नाही.

महत्वाचे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एखादा राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता विजनवासात गेल्याचे उदाहरण शोधूनही सापडायचे नाही. मतदार सुद्धा असले आरोप फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.

त्यामुळे केवळ आरोप झाल्याने उपमुख्यमंत्रीपदी राहिलेल्या एखाद्या राजकीय नेत्याने एवढे मनाला लावून घेण्याचे कारण दिसत नाही. केवळ हेच जर कारण असेल तर अजित पवारांनी परत एकदा शरद पवारांची शिकवणी घ्यावी.

त्यामुळे ३० वर्षे सामाजिक जीवनात असलेल्या एखाद्या व्यक्तीने भ्रष्टाचाराचे आरोप किंवा त्यावरून गुन्हा दाखल झाल्याने २४ तासांचा का होईना विजनवास पत्करणे कितपत योग्य आहे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जेवढे आरोप शरद पवारांवर झाले तेवढे आरोप अजित पवारांवर उभ्या आयुष्यात झाले नसतील. अनेक राजकीय चढ-उतार आले तरी प्रत्येकवेळी आपले राजकीय साम्राज्य उभारण्यासाठी शरद पवार नव्या उमेदीने उठून उभे राहायचे.... हार मानतील ते शरद पवार कसले?

अगदी राज ठाकरेंच्या शब्दात सांगायचे तर शरद पवार हे 'तेल लावलेले पहिलवान' आहेत. एक असा पहेलवान जो हाती ही लागत नाही आणि हार सुद्धा मानत नाही. गेल्या २-३ दिवसांपासून शरद पवारांनी राज ठाकरेंचे हे वाक्य तंतोतंत खरे ठरवल्याचे दिसते. 



त्यामुळे अजितदादांचे असे वागणे हे त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वालाच नाही तर 'पवार' या आडनावाला देखील शोभून दिसणारे नाही.

शरद पवारांनी जे काही गेल्या ४८ तासांमध्ये जे काही मिळवले होते, त्यावर अजितदादांच्या निर्णयानं पाणी फेरले जाण्याची शक्यता जास्त आहे. 

पण अजित पवार एवढे बॅकफूट वर का आले हा प्रश्न मोठा गहन आहे. त्यांच्यावर होणारे आरोप त्यांनी मनाला का लावून घेतले असावेत?


आपल्या टगेगिरीने त्या आरोपांची परतफेड करणे त्यांना शक्य नव्हते काय? तशी परतफेड करणे शक्य नसण्याचे कारण काय?

होणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अजित पवार यांना स्वतःची बाजू कमकुवत तर वाटत नाही ना?

असे कित्येक प्रश्न 'आ' वासून उभे आहेत. अजितदादांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने परतवून लावावे ही अपेक्षा ठेवून असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनोधैर्याला मात्र या घटनेने तडा गेला. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांनी अधिक आक्रमक होऊन जनतेच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांचे निरसन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Political conflict in the Pawar family?

पवार परिवारातील राजकीय संघर्ष?


या निमित्ताने पवार परिवारातील अंतर्गत राजकीय संघर्षाची चर्चा सुद्धा व्हायला लागली. ही चर्चा अगदीच काल परवा सुरु झाली आहे अशातील काही भाग नाही. मात्र अजित पवार मुंबईमध्ये परतल्यानंतर दीड तास केवळ आणि केवळ 'परिवारातील' सदस्यांचे खलबत होण्याचे कारण देखील गुलदस्त्यात आहे.

त्यामुळे या घटनेला कुठेतरी अंतर्गत वादाची किनार (मग तो पक्षांतर्गत असो किंवा कौटुंबिक) नक्कीच असू शकते. एरवी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये भगवा झेंडा वापरण्याची केलेली घोषणा आणि त्याला मोठ्या पवार साहेबांनी घातलेला 'खो' असेल किंवा पार्थ पवार यांच्या पराभवाचे विश्लेषण असेल, अजितदादा पक्षामध्ये अस्वस्थ होते. नाही तर हा टग्या नेता हार मानणारा नक्कीच नाही.

अर्थात पारिवारिक विषयात कुठलेही अंदाज बांधू शकत नाही; कारण भारतीय संस्कृती मध्ये पारिवारिक बंध कमकुवत नसतात; आणि नसावेतच!


अजून एक मुद्दा माध्यमांमध्ये चर्चित होता.... तो म्हणजे हा केवळ पब्लिसिटी स्टंट असावा! असू पण शकतो. पण जर का हा प्रसिद्धीसाठी स्वीकारलेला धोपटमार्ग असेल तर तो अजित पवार यांची प्रतिमा मालिन करणारा असू शकतो.

Emotional Ajit Pawar

हळवे अजित पवार...!


अजितदादा प्रत्यक्षात इतके हळवे असतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. या घटनेने अजित पवारांच्या स्वभावाचे अनोखे पैलू उघड झाले. त्यांच्यामध्ये दडलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन झाले, जे निश्चितच त्यांच्या समर्थकांना सुखावणारे ठरेल!

That is exactly what the BJP expected!

भाजपाला अपेक्षित तेच घडतंय!


राजकीय आरोपांच्या धुळवडीमध्ये भाजपाने सरशी मारल्याचे दाखविणारी ही घटना आहे. प्रतिस्पर्ध्याला पराजित किंवा नामोहरम करण्यासाठी ज्या काही युक्त्या वापरल्या जातात, त्याच प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत.

अजितदादांच्या राजीनाम्याने तूर्तास तरी भाजपाचा मानसिक विजय झाला आहे असा कयास लावता येऊ शकतो.

आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार किंवा मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छाच देऊ शकतो. तेही फक्त एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावावे यासाठीच!

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे!





ajit pawar, ajit pawar speech, ajit pawar election 2019, ajit pawar news, sharad pawar, sharad pawar news latest, sharad pawar latest news, sharad pawar in marathi, sharad pawar cast, sharad pawar city,
sharad pawar videos, sharad pawar speech, sharad pawar twitter


Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]