technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

Homeopathy can prevent Coronavirus epidemic! (Marathi)

कोरोना महामारीला होमीओपॅथीने अटकाव !

कोरोना महामारीला होमीओपॅथीने अटकाव !

कोरोना, आज हा अत्यंत जीव घेणाऱ्या विषाणू पैकी एक आहे. कोरोना कसा सुरु झाला किती पटकन तो जागतिक पातळीवर पोहचला हे सर्वांना माहित आहे. आज त्याकडे प्रत्येक देश विश्वरूपी संकट म्हणून पाहत असून योग्यरित्या हाताळण्याचा प्रयत्न करत आहे.

काही महत्वाचे प्रश्न, हे विषाणू जीव घेणे ठरू शकतात का? जिवाणू आणि विषाणूमध्ये काय फरक आहे?  विषाणूचे गुणधर्म काय असतात आणि का एवढी काळजी घेणे आवश्यक आहे? भारतासारख्या देशात लॉकडाउन असून सुद्धा रुग्णांची संख्या का वाढत आहे? हा सर्व प्रकार कधी आणि कसा थांबू शकेल? सर्व जग सुरळीत आणि निर्धास्तपणे कधी सुरु होईल? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसले असतील.


सर्वात महत्वाचे जिवाणू आणि विषाणू हे दोन्ही ही घातक ठरतात परंतु जिवाणूसाठी अँटी बॅक्टरीअल उपचार उपलब्ध असल्याने रुग्ण हा औषधे घेऊन बरा होऊ शकतो, विषाणूंसाठी मॉडर्न मेडिसिनमध्ये औषधाना बंधने येतात त्यामुळे अँटी वायरल उपचार कमी प्रमाणात यशस्वी ठरतात याचे कारण विषाणू हे जिवाणूंपेक्षा आकाराने अतिसूक्ष्म असतात, ते सामान्य सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाहीत. विषाणू हा पेशींच्या खोलवर शिरतो त्यामुळे पेशींच्या सूक्ष्म जागी कोणतेही मॉडर्न मेडिसिन जाणे अशक्य असते.

समजा विषाणूंना मारण्यासाठीची औषधे पेशींच्या खोलवर शिरली तर ती औषधे पेशींना सर्वात आधी मारतील. त्यामुळे कोणतेही मॉडर्न मेडिसिन विषाणूंना मारू शकत नाही. अशा वेळी विषाणूंना निशाण्यावर न घेता पेशींची शक्ती म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधोपचाराचा अवलंब करणे अधिक हितकारी ठरेल, अशी माहिती  पुणे येथील ज्येष्ठ हृदयरोग होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विद्यासागर उमाळकर यांनी दिली.

डॉक्टर उमाळकर पुढे म्हणतात कि, होमीओपॅथिक औषधोपचार रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करत असते . होमीओपॅथिचा इतिहास लक्षात घेता ह्या शास्त्राच्या सिद्धांताचा उल्लेख पाच हजार वर्षांपूर्वी भागवत पुराणात व्यासांनी केला होता; ''आमयो यसच भुतानां जयते येन सुव्रता|  तदेव याम्यहं द्रव्यं न पुनती चिकितसितम ||' ''similia similibus curantur .  जरी ही औषध पद्धती जर्मनी मधील डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांनी विकसित केली असली तरी याचा मूळ सिद्धांत हा भारतीयच आहे.

होमीओपॅथि ही एकमेव अशी चिकित्सा पद्धती आहे ज्या मध्ये औषधीय गुणधर्म असणारे कण हे पेशींच्या खोलवर म्हणजेच DNA आणि RNA पर्यंत पोहचतात व पेशींना विषाणूंशी लढण्यास मजबूत करतात. थोडक्यात होमीओपॅथी सूक्ष्मांतीसूक्ष्म ( nano to nano ) सिद्धांतावर म्हणजेच quantum theory  वर काम करते.

जागतिक दृष्टीने विचार केल्यास कोरोना रुग्णांची संख्या २४,०७,२९४  आहे तर त्यापैकी १,६५,०४९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ५,८६,००० रुग्ण बरे देखील झाले आहेत. भारताच्या दृष्टीने कोरोना रुग्णांची संख्या १७,२५६ इतकी असून त्या पैकी ५४३ रुग्णांनाच मृत्यू तर २४६ रुग्ण हे बरे झाले आहेत. याचा अर्थ कोरोना ग्रस्त भारतीयांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, इ. प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक इस्पितळे असून देखील रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे, त्याच बरोबर मृत्यूचे प्रमाण देखील तितक्याच गतीने वाढतांना दिसते. यावरून असे लक्षात येते की सध्याचे औषधोपचार कोरोनाला आळा घालण्यास अपुरे ठरत आहे.

भारतात विविध चिकित्सा पध्दतींचा वापर हा अनेक वर्षांपासून होत आहे आणि प्रत्येकाने आपआपले  विशेष स्थान समाजात मिळविले. या सर्व चिकित्सा पसद्धतींचे महत्व जाणून भारत सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली.त्या पैकीच एक शास्त्र म्हणजे होमिओपॅथी; तसे बघता हे एक नवीनतम शास्त्र असून केवळ प्रचलित शास्त्रांच्या उणीवा वेधून शास्त्रज्ञांनी २२५ वर्षांपूर्वी याची निर्मिती केली. अशा होमिओपॅथिक शास्त्राचा केंद्र व राज्य सरकारांनी शास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास आपण या महाभयंकर कोरोना वायरसवर अतिशय चांगल्या प्रकारे मात करू शकू.

नुकतेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम व उद्योगपती श्री राहुल बजाज यांच्या संयुक्त कल्पनेतून  पुण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोफत होमिओपॅथिक  उपचार देण्यात आल्याची माहिती हि डॉ. उमाळकर यांनी दिली.

रुबी हॉल इस्पितळाचे मॅनेजमेंट ट्रस्टी व एम. डी. कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेज ग्रांट यांनी देखील होमिओपॅथीची महती सांगितली, ते म्हणतात " रुबी हॉलच्या जवळपास ३५०० कर्मचाऱ्यांना १५ ते २० दिवसांपूर्वी HCQ नावाचे ऍलोपॅथिक औषध रोगप्रतिबंधात्मक म्हणून दिले.

परंतु तरी १८ नर्सेसाना कोरोनाची लागण झाली, त्या नंतर ७-१० दिवसांआधी होमिओपॅथीची काही औषधे त्यांना देण्यात आली, त्यामुळे रोगाची तीव्रता होमिओपॅथी औषधांनी कमी झाली असून त्या रुग्णांना इस्पितळात भरती करण्याची देखील गरज पडली नाही ".

याचाच अर्थ होमिओपॅथी तुमच्या आमच्या मधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, डॉ. उमाळकर पुढे म्हणतात कि, “आम्ही आयुष मंत्रालयाला मागणी केली आहे की रुग्णांना जर कोरोना सारख्या महामारीसाठी  ऍलोपॅथी  सोबत होमिओपॅथीची औषधे दिली तर भारत या आजाराला सक्षमपणे तोंड देऊ शकेल. तसेच अनेक पुढील आजाराची जटील प्रक्रिया होमीओपॅथीने थांबण्यास मदत होऊ शकेल.”

वरील दोन्ही उदाहरणावरून आपण निश्चितपणे असे म्हणू शकतो २१ व्या शतकात होमिओपॅथिक औषधोपचार आरोग्यदायी जगाची गुरुकिल्ली ठरेल.

डॉ. विद्यासागर उमाळकर पुढे म्हणाले कि, मी गेली बत्तीस वर्षापासून होमोपॅथिक च्या माध्यमातून हृदय विकारावर अचूक औषध उपचार व उपयोजना  करीत आहे . तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांचेकडून या कार्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

अधिक माहिती साठी संपर्क साधा -

डॉ.विद्यासागर उमाळकर,

जेष्ठ हृदयरोग होमिओपॅथिक तज्ञ,पुणे
 मो.९८६९०३०४६७

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]